ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा
माझ्या सावळ्या राणा पाचा ही तत्वांच्या
ज्योती लावल्या ध्याना निराकार वस्तू कैसी
आकारा आली , कैसी आकारा आली
सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरू माउली
सोळा सहस्त्र बाहत्तर कोठड्या काया रचिली
हरीने काया रचिली नउ खिडक्यांचा जोड
आत मूर्ती बैसविली सप्त ही सागरांचा वेढा
कैसा घातला , वेढा कैसा घातला
तुका म्हणे बाप माझा कनवाळू आला
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दसरा आम्हा
नित्य दिवाळी केशव भानुदास
जिवेभावे ओवाळी अखंड ओवाळा ओवाळा
माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळ्या राणा
पाचाही तत्वांच्या ज्योती लावल्या ध्याना